पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: देशभरातील लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली.



 या योजनेत, केंद्र शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची मदत एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये करते. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये वर्ग केले जातात. 


आतापर्यंत नऊ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत. आणि शेतकरी दहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या महिन्यात केव्हाही 10वा हप्ता जमा केला जाईल असे मीडिया रिपोर्ट्स सूचित करतात.